पुणे । महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज ४५ हजार पार झाली आहे. मुंबई पाठोपाठ पुणे जिल्हयात रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आज एकूण २०५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता ४६०३ झाली आहे. जिल्हयात केटेन्मेंट झोनसाहित इतर परिसरातही काटेकोरपणे लक्ष ठेवले जात आहे. सध्या एकूण १८९२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये डॉ नायडू आणि इतर पीएमसी केंद्रे, ससून आणि काही खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज ७ रुग्ण मृत्युमुखी पडले. मृतांची संख्या २४८ झाली आहे. आतापर्यंत २४६३ रुग्ण बरे झाले आहेत. ज्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज ११०६ समूहांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. यामध्ये ११६९६९४९ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले तर ३४५८७३७ कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. पुणे महानगर पालिकेच्या मुख्य सहायक आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती अधिकृतरीत्या त्यांच्या जिल्ह्याच्या अधिकृत ट्विटरवरून सामायिक केली आहे.
#पुणे महानगरपालिका कोरोना अहो#FightAgainstCoronavirus #PuneFightsCorona @collectorpune1 @RajSarag @PMCPune@PuneZp @gsfunde1985 @suhassatwadhar @IamSPRathod @VrushaliPatilM1@vilaskasabe2768 @NitinUSonawane1 pic.twitter.com/yHNLPHTZLh
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) May 23, 2020
जिल्ह्यात कंटेन्मेंट झोनमध्ये सक्त सामाजिक अलगाव पाळला जातो आहे. तसेच इतर ठिकाणीही सामाजिक अलगाव चे नियम पाळून संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे विलगीकरण केले जात आहे. प्रशासन नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी कडक अमलबजावणी केली जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.