पुण्यात २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू; शहरातील मृतांची संख्या ३८

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुण्यात १२ तासांमध्ये ४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत आणखीनच भर पडली आहे. हे सर्व ससून रुग्णालयात उपचार घेत होते. धक्कादायक बाब म्हणजे आजच्या मृतांमध्ये एका २७ वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश आहे. आतापर्यंत केवळ चाळीशी पार व्यक्तीच कोरोनाने दगावण्याची जास्त शक्यता असताना २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने पुणेकरांच्या चिंता वाढली आहे. पुण्यात आता मृतांची संख्या आता ३८ झाली आहे.

कोंढव्यातील ५० वर्षीय महिलेवर ससूनमध्ये उपचार सुरू होते. तिला रक्तदाबाचा त्रास होता. तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. तर पर्वती दर्शन येथील २७ वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाली होती. १२ एप्रिलला त्याला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. तो दारूचे अतिसेवन करत होता. यात त्याचे यकृत निकामी झाले होते. त्याचाही आज मृत्यू झाला.

तसेच, घोरपडी येथील ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला २ एप्रिलला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना रक्तदाब आणि किडनीचा आजार होता. कोंढव्यातील एका ४० वर्षीय महिलेला दम्याचा आजार होता. तिलाही करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना दमा आणि मधुमेह होता. त्यांचाही आज मृत्यू झाला. आज दिवसभरात काही तासांतच चौघांना करोनानं बळी गेला आहे. या चौघांसह पुण्यातील मृतांचा आकडा ३८वर पोहोचला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात १२१ करोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळल्याने राज्यातील रुग्णसंख्या २ हजार ४५५ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.काल उशिरापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २ हजार ३३४ होती. त्यामध्ये १२१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ही संख्या २ हजार ४५५ झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंते भर घालणारीच ही बातमी ठरली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

हे पण वाचा –

३० एप्रिल ऐवजी मोदींनी ३ मे पर्यंत का वाढवला लॉकडाउन, हे आहे कारण

कहर कोरोनाचा! राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजार ४५५ वर

आणि माकडांनी स्विमिंगपूलवर ‘अशी’ केली मस्ती, व्हिडिओ व्हायरल

खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

Leave a Comment