पुण्यात कोरोना पसरतोय, रुग्णांची संख्या ५ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चीनमधून जगभरात पसरणाऱ्या कोरोनाव्हायरसने लोकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शिरकाव करणाऱ्या या रोगाने पुण्यातील ५ लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. पुण्यातील रुग्णांना याची लागण मुंबईच्या लोकांपासून झाल्याचं समजत आहे.

दुबईवरून परतलेल्या दांपत्याला कोरोनाची लागण झाली. हे दांपत्य ज्यांच्या संपर्कात आले त्यांची तपासणी केली जात आहे. मुंबईवरून पुण्याला प्रवास करताना त्यांनी ज्या ओला/ उबेर टॅक्सीने प्रवास केला. त्या टॅक्सीच्या ड्रायव्हरला आणि त्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. असे एकूण 4 जण पोजिटिव्ह आढळले आहेत. आरोग्ययंत्रणा याचा संसर्ग जास्त लोकांना होऊ नये यासाठी काळजी घेत आहे.

पुण्यामधील या संसर्गाची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. विमानतळावर लोकांची तपासणी करणं गरजेचं असताना दुबईवरुन आलेल्या पर्यटकांना असंच कसं सोडण्यात आलं याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान पुण्यातील सुरुवातीचे दोन रुग्ण नायडू हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल असुन त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

कोरोनासंदर्भात काय काळजी घ्याल –

या जीवघेण्या विषाणूच्या लागण पासून दूर राहण्यासाठी आपली सजगता खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी याला घाबरून न जाता याचा मुकाबला केल्यास याचा पसार नक्की थांबेल. शक्यतो या विषाणूबाबतच्या अफवा रोखून योग्य ती अधिकृत माहिती घ्यावी, नियमितपणे हात स्वच्छ धुवावे, खूप महत्वाचे म्हणजे गर्दीची ठिकाणे टाळावीच, आणि चौरस आहार घ्यावा.