पुणे मनपा क्षेत्रात २५३ कोरोनाग्रस्त तर एकट्या भवानीपेठेत ६९, पहा वार्डनिहाय रुग्णसंख्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या १९८२ कोरोना बाधित रुग्ण आहेत. यातील पुणे मनपा क्षेत्रात एकुण २५३ कोरोनाग्रस्त असून यातील सर्वाधिक ६९ रुग्ण एकट्या भवानीपेठेत आहेत.

हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भवानी पेठ वार्डमध्ये ६९, कसबा विश्रामबाग वार्डमध्ये ३३, ढोले पाटील ३१, हडपसर मुंढवा २१, धनकवडी सहकारनगर १९, येरवडा १६, शिवाजीनगर घोले रोड ११, कोंढवा येवलेवाडी ८, सिंहगड रोड ५, औंध बाणेर ३, वार्जे कर्वेनगर १ अशी कोरोनाग्रस्तांची आकडेवारी आहे.

दरम्यान, राज्यातील १९८२ कोरोनाग्रस्तांपैकी आत्तापर्यंत १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात पुणे मनपा क्षेत्रात एकुण २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. पुणे ग्रामिण मध्ये आत्तापर्यंत १२ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये ३१ कोरोनाग्रस्त सापडले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

tdh

Leave a Comment