Pune Crime : पुण्यात भररस्त्यात कोयता हल्ल्याचा थरार, CCTV पाहून धडकी भरेल

Pune Crime Koyta Gang
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात मागच्या वर्षभरात गुन्हेगारीचे प्रमाण (Pune Crime) वाढलं आहे. .. खून, मारामाऱ्याच्या घटनांनी पुण्याचं नाव दिवसेंदिवस खराब होत आहे…. त्यात भर पडली आहे कोयता गॅंगची … काल रात्री बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ गटात कोयत्याने एकमेकांवर हल्ला करण्याची घटना घडली आहे… या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आले असून ते पाहून तुमच्याही मनात नक्कीच धडकी भरेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत विडिओ शेअर केला आहे. तसेच राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

काय आहे रोहित पवार यांचं ट्विट?

रोहित पवार यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल, पुण्यातल्या कोयता गँग चा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते….आणि हा बघा कोयता गँग चा कालचा थरार! पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती! असं ट्विट रोहित पवार यांनी केल आहे.. तसेच कोयता हल्ल्याचा संपूर्ण थरार व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे.

व्हिडिओ मध्ये काय दिसतंय- Pune Crime

तुम्ही या सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघू शकता, व्हिडीओमध्ये काही लोक एका चारचाकी समोर उभे असल्याचे दिसत आहे. त्यांच्यात काहीतरी खटके उडाल्याचे दिसत आहे. त्याचदरम्यान, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या हातातून कोयता घेतो आणि समोरच्या गटातील व्यक्तीवर वार करतो. त्यानंतर तो कोयता घेऊन दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर जातो. यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे .पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी सुरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार आणि सतीश पवार या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. हे चारही जण पुण्यातील सराईत गु्न्हेगार असून त्यांनी यापूर्वीही अशाप्रकारे दहशत माजवण्याचा (Pune Crime) प्रयत्न केला होता असं म्हंटल जातंय.