Pune Local Train : मुंबईप्रमाणे पुण्यातही लोकल ट्रेन सुरु होणार? सरकारकडून आलं हे उत्तर

Pune Local Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Local Train। पुणे शहर आणि वाहतूक कोंडी हे कधीही न सुटलेलं कोड…. पुण्यात लोकसंख्या इतकी दाट आहे कि वाहतूक कोंडीचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतोय. मागच्या काही वर्षात पुण्यातील रस्त्यांचा कायापालट झाला आहे, अनेक नवीव उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. एवढच नव्हे तर मेट्रो रेल्वे सेवाही पुणेकरांच्या सेवेत आहेत. मात्र अजूनही पुणेकरांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच एकूण सर्व पार्श्वभूमीवर आता मुंबई प्रमाणेच पुणे शहरातही लोकल ट्रेन सुरु कराव्या अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात शिवतारेंनी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना हि मागणी केली.

शिवतारे नेमकं काय म्हणाले? Pune Local Train

आपल्या भाषणात विजय शिवतारे म्हणाले, पुणे शहरात वाहतुकीचा प्रश्न महत्वाचा आहे. पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, आयटी सेक्टर, एमआयडीसी मध्ये मोठया प्रमाणात कामगार आणि कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीवर उपाय करावा. यासाठी पुणे शहरापासून राजेवाडी नीरा, जेजुरी, दौंड , फलटण लोकल सेवा (Pune Local Train) सुरु केली तर त्याच्यातून १० ते २० हजार कर्मचाऱ्यांसाठी चांगली सोय होईल, त्यामुळे हि लोकल सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रेल्वे विभागाला विंनती करावी. लोणावळा ते पुणे लोकल फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे. या फेऱ्या वाढवल्या तरी वाहतुकीवर फरक पडेल. तिसरी गोष्ट म्हणजे पुणे शहरातील रस्ते लहान आहे, ते मोठे करण्यासाठी मुंबई- ठाण्याप्रमाणे क्लस्टर योजना सुरू करावी.

विजय शिवतारे पुढे म्हणाले, पुण्यातील मुळा आणि मुठा नदीची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे मुळा आणि मुठा नदीच्या पात्राच्या बाजूने मुंबई सारखीच लोकल ट्रेनची (Pune Local Train) सुव्यवस्था केली तर पुण्याच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वाहतूक सेवेवर मोठा फरक पडेल. सध्या पुण्यात मेट्रो सेवा आहे. पण मेट्रो स्टेशन आणि पीएमपीएमएलची कनेक्टीव्हिटी नाही. त्यामुळे प्रवास करताना गैर सोय होते, त्यामुळे पुणे मेट्रो स्टेशन पासून पीएमपीएमएल पर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवावी असं शिवतारे यावेळी म्हणाले. विजय शिवतारेंच्या यांच्या या सर्व मागण्यांवर सरकारकडून राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. या सर्व सूचना विचारात घेण्यात येतील असं माधुरी मिसाळ यांनी म्हंटल. त्यामुळे सरकार किती सकारात्मकता दाखवणार याकडे पुणेकरांच लक्ष्य असेल.