हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मैदान एक.. खेळाडू चार.. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी, भाजपकडून इच्छुक असणारे सगळेच नेते, राजकारणात तेल लावलेले पहिलवान!, त्यामुळे गिरीश बापटानंतर पुण्याचा हा गड , कुणाच्या खांद्यावर सोपवायचा?, हा मोठा प्रश्न हाय कमांडला होता.. त्यात निष्ठावान, ब्राह्मण मतदार, जनसंपर्क आणि अजून बऱ्याच गोष्टी, पुण्यात उमेदवार देताना बघाव्या लागत असताना, अखेर भाजपने यावर तोडगा काढला.. मागील काही दिवसांपासून, पुणे शहरात मोहोळ विरुद्ध मुळीक , यांच्यात जे काही पोस्टर वॉर बघायला मिळालं.. त्यात मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) सरशी ठरले.. आणि लोकसभेसाठी (Pune Lok Sabha 2024) पुणे भाजपासाठी, पक्षाचे अधिकृत प्रमुख उमेदवार ठरले..
तसं पाहायला गेलं, तर मुरलीधर अण्णा मोहोळ हे नाव तसं पुण्यासाठी नवीन नाहीये.. आपण ज्या कोथरुडमध्ये राहातो, त्या भागाची शिस्त म्हणून, मुरलीधर मोहोळ वयाच्या बाराव्या वर्षी ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला जाऊ लागले.. पुढे वर्ष-दीड वर्षात, ते भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झाले ते फक्त दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांमुळे.. मग, तेथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.. पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, पुढे काॅलेज आणि कुस्तीसाठी त्यांनी कोल्हापूर गाठलं.. कोल्हापुरात तालीम केलेले मोहोळ 1993 च्या सुमाराला पुण्याच्या राजकीय आखाड्यात उतरले.. पुणे महानगरपालिकेचे सभासद म्हणून, ते 2002 पासून सलग चार वेळा निवडून येतायेत..
2019 मध्ये त्यांना, महापौर पद देण्यात आल्यानंतर, त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा वाढीस लागल्या.. महापौर असताना, कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा, आजही शहरात सर्वत्र होताना पाहायला मिळते.. यासोबत त्यांनी, अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष पद, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद, PMPL चे संचालक आणि PMRDA चे सभासद म्हणूनही काम पाहिलय.. भाजपसाठी जनतेतील नेतृत्व, आणि शांत संयमीपणाने राजकारण करणाऱ्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी, त्यांचं नाव घेतलं जातं.. मागील पाच वर्षांपासून या ना त्या कारणाने, पुण्यात मुरलीधर अण्णा हे नाव प्रत्येकाच्या ओठांवर, एकदा तरी आलं असेल.. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कुस्ती स्पर्धा , आणि पक्षाचे राजकीय कार्यक्रम आयोजित करून, त्यांनी शहरात आपल्या नावाला याआधीच वलय प्राप्त करून दिलं होतं.. त्यामुळे पुण्यासारख्या प्रतिष्ठेच्या , जागेवर मुरलीधर मोहोळ यांचं नाव, पक्क झाल्यानं महाविकास आघाडीसाठी, ही नक्कीच कठीण फाईट ठरणार आहे..
2009 साली, खडकवासल्यातून विधानसभेचा अनुभव असलेल्या मोहोळ यांच्यासाठी, लोकसभेचा हा पहिलाच अनुभव असणार आहे.. पुण्यातून जे कोणी खासदार निवडून आले, त्यांची पॉलिटिकल ग्रोथ ही बरीच मोठी पाहायला मिळाली.. मोहन धारिया, विठ्ठल गाडगीळ आणि पुण्यात राजकारणाचा सेंटर पॉइंट जे घेऊन आले ते सुरेश कलमाडी, ही काही दिग्गज नाव, याच पुण्याने देशाला दिली.. त्यामुळे मुरलीधर अण्णा यांच्यासाठी, हा राजकारणातील सुवर्णयोग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.. पक्षांतर्गत स्थानिक नेत्यांची मनं न दुखवता.. ब्राह्मण मतदार नाराज होऊ नये, यासाठी मेधा कुलकर्णी यांना डायरेक्ट राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय.. असा सगळा खटाटोप, मुरलीधर अण्णा यांना तिकीट देण्यासाठी पक्षाकडून करण्यात आला , हे तर आता स्पष्ट आहे.. यातून भाजप, आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस, यांच्या मोहोळ किती जवळचे आहेत, याचाही अंदाज आपल्याला येऊ शकतो.. त्यामुळे एक सामान्य कार्यकर्ता होण्यापासून, ते आता दिल्लीची लढाई लढण्यापर्यंत, मुरलीधर अण्णा मोहोळ यांची राजकीय कारकीर्द, येत्या काळात मोठी होताना दिसेल.. एवढं मात्र नक्की..