Pune Lonavala Tourism Bus : पुणे ते लोणावळा स्पेशल पर्यटन बस सुरु; तिकीट किती? कुठे-कुठे थांबणार?

Pune Lonavala Tourism Bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Lonavala Tourism Bus पुण्याहून लोणावळ्याला पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ने लोणावळ्यासाठी स्पेशल इलेक्ट्रिक पर्यटन बस सेवा सुरु केली आहे. या बसच्या माध्यमातून प्रवाशांना अगदी आरामात लोणावळ्याला जाता येईल. पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी या नव्या बसला हिरवा झेंडा दाखवला. ज्यात ९९ प्रवासी होते. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये महिला पर्यटकांची संख्या जास्त होती.

कुठे कुठे थांबणार ? Pune Lonavala Tourism Bus

रूट नंबर ११ वरून सुरु झालेली स्वारगेट लोणावळा बस (Pune Lonavala Tourism Bus) डेक्कन जिमखाना, एकवीरा देवी मंदिर आणि कार्ला गुंफा येथे थांबेल. णावळा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर पर्यटक स्वतःहून भूशी धरण, मनशक्ती ध्यान केंद्र आणि मेण संग्रहालय यासारख्या जवळच्या ठिकाणांना जाऊ शकतात. लोणावळ्या पोचल्यानंतर बस त्याच दिवशी पुन्हा रिटर्न स्वारगेटला येईल. प्रवासादरम्यानच्या ठिकाणांबद्दल माहिती देण्यासाठी प्रत्येक बससोबत एक मार्गदर्शक असतो.

तिकीट किती?

स्वारगेट ते लोणावळा साठी (Pune Lonavala Tourism Bus) प्रत्येक प्रवाशाकडून एका फेरीसाठी ५०० रुपये तिकीट आकारले जातात. यासाठी डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, कात्रज, स्वारगेट, हडपसर, पुणे महानगरपालिका भवन, निगडी आणि भोसरी यासह शहरातील प्रमुख ठिकाणी असलेल्या पीएमपीएमएल पास सेंटरवर तिकिटे बुक करता येतात. या पर्यटन प्रवासासाठी खास अशी ऑफर सुद्धा ठेवण्यात आली आहे. बस मधील सर्वच्या सर्व ३३ तिकिटे एकदम ग्रुपने बुक केल्यास प्रवाशांना ५ तिकिटांचे पैसे माफ होणार आहेत.

जर प्रवाशांचा प्रतिसाद कमी असेल किंवा काही अपरिहार्य कारणास्तव बस सेवा रद्द झाली, तर बुकिंग केलेल्या प्रवाशांना पीएमपीच्या अन्य पर्यटन मार्गांवर प्रवास करण्याची सुविधा दिली जाणार आहे. तसेच, ज्या दिवशी प्रवाशांचे आरक्षण आहे त्या दिवशी त्यांनी त्यांच्या राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत व सायंकाळी पुन्हा त्यांच्या राहत्या घरी पोहोचण्यासाठी पीएमपीच्या अन्य बस मार्गांद्वारे मोफत प्रवास करता येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.