पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये आपल्या मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून (drowned) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे या तरुणाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस रेस्क्यू टीमसह घटनास्थळी (drowned) दाखल झाले. त्यानंतर तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला. अखेर तासाभराच्या प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला (drowned) यश आले. या दुर्दैवी घटनेमुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश, मित्रांना धक्का
किसन शशिकांत बोराडे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो आपल्या चार मित्रांसोबत पोहण्यासाठी (drowned) गेला होता. मावळ तालुक्यामधील डोणे येथे पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून (drowned) मृत्यू झाला. आपल्या घरातील तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचे समजताच बोराडे कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.
काय घडले नेमके ?
किसन बोराडे हा डोणे येथे पोहण्यासाठी गेला होता. ज्या ठिकाणी तो पोहत होता, तेथील पाण्यातील गाळाचा त्याला अंदाज आला नाही. किसनचा पाय गाळात रुतला गेला आणि त्यामुळे तो पाण्यात बुडाला (drowned) आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???