पुणे : महापौरपदी मुरलीधर मोहोळ तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची वर्णी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । महाशिआघाडीच्या प्रकाश कदम यांचा पराभव करून भाजपचे मुरलीधर किसनराव मोहोळ हे पुणे मनपाच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत . तर भाजपच्या सरस्वती शेंडगे यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ पडली आहे . पुण्याचे महापौर पद हे खुल्या गटासाठी आरक्षित होते . पुणे महानगरपालिकेत भाजपचे संख्याबळ पाहता महापौर भाजपचाच होणार हे निश्चितच होते . निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत केली .

WhatsApp Image 2019-11-22 at 1.59.56 PM.jpeg

कौस्तुभ दिवेकर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना ९७ मते पडली , तर राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेसचे प्रकाश कदम यांना ५९ मते पडली . मनसेने मात्र या निवडणुकीमध्ये तटस्थ भूमिका घेतली .

Leave a Comment