Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचे PM मोदींच्या हस्ते उदघाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (6 मार्च) 15,400 कोटी रुपयांच्या अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी पुणे मेट्रोचा (Pune Metro) भूमिपूजन केलं. याशिवाय रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या पुणे मेट्रोच्या मार्गाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथिगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Pune Metro) उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते.

गेल्या पावणेदोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणावर विकास काम सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आलं हा मार्ग ४.४ किलोमीटरचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग त्यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडोर हा निगडी पर्यंत विस्तारित होणार आहे. पुण्यातील (Pune Metro) रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गाचं ट्रायल रन 5 फेब्रुवारी 2024 रोजी झाली होती.

किती असेल तिकीट ? (Pune Metro)

आज उदघाटन झालेल्या रुबी हॉल क्लिनिक (Pune Metro) ते रामवाडी या दरम्यान या 5.5 किमीच्या पट्ट्यात बंड गार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी अशी चार स्थानके आहेत. तर वनाज ते रामवाडी- 30 रुपये तसेच रुबी हॉल ते रामवाडी- 20 रुपये असे तिकीट या मेट्रोला असेल.

महाराष्ट्राला मोठा फायदा

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, रेल्वे आणि मेट्रोसाठी सुद्धा राज्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. ज्याचा फायदा नागरिकांना होतोय. आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो (Pune Metro) मार्गाची भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आज त्यांच्याच हस्तेही मेट्रो सेवा सुरू झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रोमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील बचत होणार आहे. मोदींची गॅरंटी असलेले सर्व प्रकल्प आणि विकास काम गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होतोय असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं