पुणे । पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाजीनगर न्यायालयातील बेपत्ता वकिलाची हत्या करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात फेकण्यात आला. या घटनेत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. उमेश चंद्रशेखर मोरे (वय ३३, रा. धनकवडी) असे अपहरण आणि हत्या झालेल्या वकिलाचे नाव आहे.
कपिल विलास फलके (वय ३४, चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय २८, आष्टी, जि. बीड), रोहित दत्तात्रय शेंडे (वय ३२, मार्केट यार्ड, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांनी उमेश मोरे यांचे आधी अपहरण केले आणि त्यानंतर त्यांचा खून केला. मोरे यांचा खून केल्यावर त्यांचा मृतदेह ताम्हणी घाटात फेकण्यात आला.
सुरुवातीच्या तपासात जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या या तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या अपहरण आणि हत्याप्रकरणात आणखी काही हाती लागण्याच्या दिशेनं पोलीस अधिक तपास करत आहेत.
निर्दयी! नवजात मुलीचा जन्मदात्या आईनेच गळा आवळून केला खून
वाचा सविस्तर -👉 https://t.co/WvG4vB79S5#CrimesAgainstHumanity #CrimesAgainstChildren #crime #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 19, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”