हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे महानगरपालिकेने (Pune Mahanagarpalika) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत ‘वरिष्ठ निवासी’, ‘कनिष्ठ निवासी’ आणि ‘शिक्षक’ पदांसाठी एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. खास म्हणजे, या भरतीअंतर्गत उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.
रिक्त पदांची माहिती
या भरतीअंतर्गत वरिष्ठ निवासी पदासाठी 15, कनिष्ठ निवासी पदासाठी 12, तर शिक्षक पदासाठी 2 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही संधी आहे. ही भरती प्रक्रिया पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येथे पार पडणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून आवश्यक पात्रतेबाबत सविस्तर माहिती घ्यावी. तसेच, या भरतीसाठी उमेदवारांचे वय 38 ते 45 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.
पगार किती मिळणार?
वरिष्ठ निवासी: 80,250 प्रतिमाह
शिक्षक: 64,551 प्रतिमाह
कनिष्ठ निवासी: 64,551 प्रतिमाह
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. कारण, थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 13 फेब्रुवारी 2025 रोजी
भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – 411011 येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे.




