Pune Nagpur Vande Bharat Express : पुणे- नागपूर वंदे भारत ट्रेन!! याच महिन्यात धावण्याची शक्यता

Pune Nagpur Vande Bharat Express
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nagpur Vande Bharat Express । मागच्या काही महिन्यात महाराष्ट्रातून अनेक नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे लौंचिंग झालं आहे. वेगवेगळ्या मार्गावर या ट्रेन धावत असल्याने लोकांचा प्रवास सोपा आणि आरामदायी झाला आहे. आता याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट मध्ये आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार असल्याचीच माहिती समोर येत आहे. हि वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पुणे ते नागपूर (अजनी) दरम्यान धावेल.

पुणे आणि नागपूर हि दोन्ही शहरे महाराष्ट्रातील महत्वाची शहरे मानली जातात. पुणे हि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते तर नागपूर हि महाराष्ट्राची उपराजधानी आहे. दोन्ही शहरे हे इंडस्ट्रियल हब म्हणून गणले जातात. नागपूर मधून पुण्यात स्थायिक झालेल्या लोकांची संख्याही जास्त आहे. परंतु मर्यादित रेल्वेचं नेटवर्क, महागडी विमानसेवा आणि खर्चात पाडणाऱ्या ट्रॅव्हल्स यामुळे पुणे ते नागपूर वंदे भारत ट्रेन (Pune Nagpur Vande Bharat Express) सुरु व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत होती. अखेर रेल्वेकडून आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

सध्या नागपूर ते पुणे रेल्वे प्रवास करायचं म्हंटल तर काही मोजक्याच ट्रेन आहेत. त्यातही प्रवाशांचा १२- १३ तासांचा वेळ जातो. मात्र एकदा का पुण्याहून नागपूरला वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली तर हाच प्रवास १० तासांवर येणार आहे. म्हणजेच प्रवाशांचा २-३ तासांचा वेळ वाचणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नागपूर (अजनी), बेळगाव-बंगळूर आणि कटरा-अमृतसर या तीन नवीन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. ऑगस्ट महिनाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्‍घाटन होण्याची शक्यता आहे. Pune Nagpur Vande Bharat Express

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा – Pune Nagpur Vande Bharat Express

पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबा मिळेल. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल. गर्दीच्या प्रवासाच्या हंगामात किंवा उत्सवांच्या काळात अजनी-पुणे वंदे भारत ही परवडणारी वंदे भारत ट्रेन प्रवाशांसाठी गेम-चेंजर ठरू शकते.