Pune-Nashik Highway : पुणे ते नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि व्यवसायांसाठी चांगली बातमी आहे. 213 किमी लांबीच्या पुणे-नाशिक औद्योगिक (Pune-Nashik Highway) महामार्गाला नुकताच महाराष्ट्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पुढच्या काही वर्षात हा रास्ता पूर्ण होणार आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ हा पाच तासांवरून थेट तीन तासांवर येईल. साहजिकच इथल्या प्रवाशांना आणि व्यवसायिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
20,000 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) राज्यभरात 4,217 किमी लांबीचे महामार्ग नेटवर्क तयार केले जात आहे. त्यापैकीच हा एक महत्वाचा प्रकल्प आहे. पुणे-नाशिक एक्स्प्रेस (Pune-Nashik Highway) वेमुळे केवळ ही दोन शहरे कमी वेळात जोडली जाणार नाहीत तर यामुळे पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला देखील चालना मिळणार आहे. सुमारे 20,000 कोटी रुपये खर्चून हा महामार्ग बांधण्यात येणार आहे.
महामार्गाचे तीन टप्पे (Pune-Nashik Highway)
हा महामार्ग राजगुरुनगर, चाकण, मंचर आणि शिर्डी या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राला सुद्धा जोडला जाणार आहे. या महामार्गाचे तीन महत्वाच्या टप्प्यात विभाजन केलं जाणार आहे. त्यातील पहिलाटप्पा पुणे ते शिर्डी असा असून 135 किमी अंतर कापेल. यातील दुसरा टप्पा , जो आधीच सुरत-चेन्नई एक्स्प्रेस वेचा एक भाग आहे, शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड (Pune-Nashik Highway) इंटरचेंजपर्यंत ६० किमी अंतर कापेल. शेवटचा आणि तिसरा टप्पा नाशिक-निफाड इंटरचेंज ते नाशिकपर्यंत जो 60 किमी अंतर कापेल.
पुणे-नाशिक एक्स्प्रेसवे (Pune-Nashik Highway) मुळे या भागातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांना आवश्यक रीतीने चालना मिळणार आहे. हा नवीन द्रुतगती मार्ग शहरांना आधुनिक लुकसह प्रगतीपथावर नेईल. जलद प्रवासासह या महामार्गामुळे देशाच्या आर्थिक विकासात सुद्धा भर पडणार आहे.