हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महामार्गाचे काम हे राज्यात चांगलेच जोर धरताना दिसून येत आहे. समृद्धी महामार्गाचेही काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे वाहतूक कोंडीमुळे ग्रासले जात आहे. त्यासाठी पर्याय म्हणून आता पुण्याला नवीन महामार्ग मिळणार आहे. आता या महामार्गला कोणते प्रमुख शहर जोडले जाईल याबाबत जाणून घेऊयात.
शहरात रिंग रोडचे काम सुरु
पुणे शहरत हे आयटी हब म्हणून नुकतेच नावारूपाला आले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरात सध्या दोन रिंग रोड तयार होण्याच्या मार्गांवर आहेत. त्यातील एक हा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तयार केला जाणार आहे. तर दुसरा पीएमआरडीए कडून केला जाणार आहे.
गडकरींनी दिली नव्या प्रकल्पाला मंजुरी
पुण्यातील वाहतुकीला उच्च दर्जा देण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातल्या दोन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी शासनाकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तब्ब्ल 35,009 कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कोणते असतील हे प्रकल्प?
राज्य सरकारने नुकतेच पायाभूत सुविधा मंडळ स्थापन केले आहे. त्या अंतर्गत हा महामार्ग बांधला जाणार आहे. पुण्यात सुरु होणाऱ्या या प्रकल्पाची सर्वांनाच उत्सुकता आहे. यामध्ये शहरातील रस्ता, उड्डाणपुल आणि त्यावर मेट्रो असा हा प्रकल्प असून त्यासाठी 20,000 कोटी रुपये दिले आहेत. तसेच या होणाऱ्या नव्या महामार्गामुळे छत्रपती संभाजीनगर हे प्रमुख शहर जोडले जाणार आहे. हा महामार्ग चाकण, तळेगाव मार्गे जाणार आहे. आणि त्यामुळे वाहतुकीस चालना मिळणार आहे.