हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे (Pune News) तिथे काय उणे असे जरी असले तरी रस्त्यांचा प्रश्न हा सर्वदूरपर्यंत सारखाच असतो. तसेच ज्या पुण्यात काही उणे भासत नसले तरी तिथले काही रस्ते (Pune Road) आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हे लक्षात घेणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेऊन आता पुण्यातील तब्बल 15 रस्त्यांचा पुनरविकास होणार आहे. हे रस्ते नेमके कोणते आहेत आणि यामध्ये नेमका काय बदल होणार आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
कोणत्या रस्त्यांचा होणार विकास?
पुण्यातील रस्त्यांचा विकास हा मागील काही दिवसांपासून रखडला होता. आता त्याचाच विकास करण्यासाठी पुणे प्रशासन पुढे सरसावले आहे. ह्यामध्ये एकूण 15 रस्त्यांचा समावेश असणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर रस्ता, पौड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, मगरपट्टा रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, विमानतळ रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, गणेशखिंड रस्ता, संगमवाडी रस्ता व बाजीराव रस्ता ह्यांचा समावेश आहे.
कसा होईल विकास?
ह्या 15 रस्त्यांचा विकास करण्यासाठी फुटपाथ, खड्डे बुजवणे, रस्त्यांचे डांबरीकरण करणे, पथदिवे लावणे, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन करणे , पावसाळ्यात रस्त्यावरचे गटार दुरुस्ती , सांडपाण्याची व्हिलेवाट लावणे, पाईपलाईन तयार करणे, आणि एवढेच नव्हे तर पुढील तीन वर्ष रस्त्याचे खोदकाम केले जाणार नाही ह्यावरही लक्ष ठेवले जाईल. असे विविध काम हाती घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि रस्त्याचा विकास केला जाईल. जेव्हा पुण्यात G -20 परिषद होणार होती तेव्हा सरकारकडून तब्बल 200 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला होता. त्यातलाचा 139 कोटी रुपये एवढा निधी रस्त्यांसाठी वापरायचा असा निर्णय घेण्यात आला होता.
समन्वय साधून रस्त्यांचा विकास करावा
दिलेल्या निधीच्या अंतर्गत पथ विभाग रस्ते तयार करत असतात मात्र हे बनवलेले रस्ते इतर विभागाकडून खोदून ठेवले जात. त्यामुळे रस्त्यांचा विकास हा खुटला जायचा. आणि परिणामी रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परंतु ह्यावेळी असं होऊ नये ह्यासाठी उच्चपदस्त अधिकाऱ्यांनी ह्याबाबत विभागांशी समन्वय करून रस्त्याचा विकास करावा असे सांगितले होते. मात्र त्याचा उपयोग झाला नसल्यामुळे ह्यावेळी रस्ते बांधताना पुनर्डांबरीकरण करन्याआधी इतर कामे आधी करून घेतली जातील. पुणे प्रशासनाचे आयुक्त विक्रमकुमार ह्यांनी मिशन 15 चा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, मिशन 15 चे काम येत्या 10 तारखेपासून सुरु केले जाणार आहे. तसेच त्यामध्ये काही अनधिकृत गोष्टी घडल्या तर संबंधित अधिकाऱ्यावर लगेच कारवाई केली जाईल. असे सांगण्यात आले आहे.