महाराष्ट्रातील ‘या’ शहरात स्फोटकांचा मोठा साठा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

पुणे | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील पिंपळवाडी येथे एका व्यक्तीकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अभंग नामक व्यक्तीला अटक केली आहे.

 

पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली. पोलिसांनी राजाराम अभंग याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळवाडी येथील राजाराम अभंग याच्याकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.

 

पोलिसांनी अभंग याच्या घरावर छापा टाकला असता त्यांना इलेक्ट्रिक गन, पाईप बॉम्ब, तलवार, कोयता, भाले, बॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रिक उपकरणे आदी स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला. अभंगविषयी अधिक माहिती तपासली असता अभंग हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वी त्याने 2003 साली त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाला ठार मारण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. बॉम्ब बनविण्याचा आणि शस्त्राचा साठा यापूर्वी मुंबईत वैभव राऊत यांच्याकडे सापडला होता.

Leave a Comment