पुण्यात रात्री संचारबंदी नव्हे तर..; पुणे पोलिसांनी ‘नाईट कर्फ्यू’त केले ‘हे’ बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । कोरोनाच्या नव्या धोक्यानंतर राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. शासनाने लागू केलेल्या संचारबंदीत पुणे पोलिसांनी अंशत: बदल केला आहे. त्यानुसार पुणे शहरात रात्री संचारबंदी लागू राहणार नसून जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येणे व फिरणे याला मनाई करण्यात आली आहे.

अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवा तसेच वस्तू यांना यातून सवलत देण्यात आली आहे. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी शुक्रवारी रात्री याबाबतचा आदेश काढला आहे. त्यानुसार ५ जानेवारीपर्यंत दररोज रात्री २३ ते दुसरे दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यात ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांनी एकत्र येण्यास व फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

याअगोदर २२ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारास मनाई करण्यात आली होती. त्यात आता बदल करुन लोकांना जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’