Pune News : कोयता गँगच्या सदस्याला पोलिसांनी पकडून धो धो धुतलं; पहा Video

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील सिंहगड विधी महाविद्यालय आंबेगाव परिसरात कोयता गँगची दहशत वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात सिंहगड लॉ कॉलेज परिसरात बुधवारी रात्री एक थरारक घटना घडली. या ठिकाणी कोयता गॅंगमधील दोन सदस्यांनी हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक पोलिसांनी गॅंगमधील एक सदस्याला पकडून धो धो धुतले. पोलिसांनी सिंघम स्टाईलमध्ये गॅंगमधील सदस्यांना शिकवलेल्या धड्याची नागरिकात चर्चा होत आहे.

पुण्यात सिंहगड विधी महाविद्यालय, आंबेगाव परिसरात 28 डिसेंबर रोजी रात्रीच्यावेळी कोयता गँगच्या दोन सदस्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गॅंगमधील सदस्यांनी हातात कोयता घेत लोकांवर हल्ला केला तसेच वाहनांच्या काचाही फोडल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी काही लोकांनी आपल्या मोबाईल मधील कॅमेऱ्यात त्यांच्या दहशतीचे चित्रीकरण केले. तर काही स्थानिक नागरिकांनी घडलेल्या घटनेची माहिती हद्दीतील पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली.

https://www.instagram.com/reel/Cmymh7IBWV0/?igshid=YmMyMTA2M2Y=

या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे मार्शल धनंजय पाटील व अक्षय इंगवले या दोघांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हल्लेखोरांचा पाठलाग करून त्यांना पकडले. मात्र, त्यातील एका अल्पवयीन मुलगा त्यांच्या हाती लागला तर दुसरा करण दळवी नावाचा सदस्य निसटून गेला. यानंतर पोलिसांनी त्यातील एकाला भर रस्त्यात नागरिकांसमोर आणून बेदम चोप दिला. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आ

Dhananjay Patil , Akshay Ingwale

जीवाची पर्वा न करता पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

सिंहगड विधी महाविद्यालय आंबेगाव परिसरात कोयता गॅंगमधील दोन सदस्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हातात कोयता घेऊन दिसेल त्या नागरिकांवर हल्ला केला. तरकाही वाहनांचे नुकसानही केले. या घटनेची माहिती हद्दीत त्या परिसरात गस्त घालत असणाऱ्या सिंहगड पोलीस ठाण्याच्या मार्शल धनंजय पाटील व अक्षय इंगवले यांना मिळाली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन आपल्या जीवाची पर्वा न करता गॅंगमधील धडाकेबाज कामगिरी दाखवत गॅंगमधील सदस्याला पकडून खाकीची ताकत काय असते ते दाखवून दिले.

हिवाळी अधिवेशनातही कोयता गँगचा उल्लेख

नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात दहशत माजविणाऱ्या या कोयता गँगचा उल्लेख केला. त्यांनी या गँगचा पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.