Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादीची युती तुटली!! दादांचा प्रस्ताव साहेबांनी फेटाळला

Pune Politics
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Politics । महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येतेय. पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतांना अखेरचा पूर्णविराम मिळाला आहे. खरं तर मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याबाबत दोन्ही बाजूनी महत्वाच्या नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या. मात्र अखेरच्या क्षणी अजित पवारांनी अशी एक मागणी केली कि राष्ट्रवादीची संभाव्ययुती तुटली. शरद पवारांच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर लढावं अशी अट अजित पवारांनी घातली, शरद पवारांनी तात्काळ दादांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत हे नक्की झालं. शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी यावर शिक्कामोर्तब केलं.

पवार गटाला अवघ्या ३५ जागा– Pune Politics

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी शरद पवार गटाचे नेते माजी महापौर अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती होस्टेलवर शुक्रवारी रात्री भेट घेतली. त्यावेळी जागावाटप आणि कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची यावर चर्चा झाली. शरद पवार गटाला तुतारी चिन्हावर निवडणूक लढवायची होती. मात्र अजित पवार गटाने तुतारीच्या उमेदवारांना घड्याळाच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव टाकला, आणि शरद पवार गटाला जागाही अवघ्या ३५ दिल्या. त्यामुळे शरद पवार गटाने अजित पवारांचा हा प्रस्ताव नाकारला आणि युतीची चर्चा फिस्कटली. यानंतर दोन्ही राष्ट्रवादीची पुणे महापालिकेत आघाडी होणार नाही. आम्ही महाविकास आघाडीतून लढणार असल्याची माहिती अंकुश काकडे यांनी दिली. Pune Politics

शरद पवार गट आता महाविकास आघाडीच्या माध्यमातुन पुणे महापालिका निवडणूक लढवेल. त्यासंदर्भात काँग्रेस आणि ठाकरे गटाशी बोलणी सुरु आहे. काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांची उशिरा रात्री संयुक्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विशाल तांबे, अंकुश काकडे, मनाली भिलारे, अश्विनी कदम आणि आमदार बापू पठारे, तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे, अभय छाजेड, रमेश बागवे आणि ठाकरेंच्या शिवसेनेते वसंत मोरे, गजानन थरकुडे, संजय मोरे हे उपस्थित होते.