Pune Railway Station : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी!! रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाला गती

Pune Railway Station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway Station) विस्तारकरणाच्या कामाला अखेर वेग आलेला दिसतो आहे. पुणे स्थानकातील विकासकामासाठी 51 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे स्थानकात होणाऱ्या बदलामुळे स्थानकातील प्रवाश्याची होणारी गर्दी कमी होण्यासाठी मदत होईल. सध्यस्थितीत काम प्रगतीपथावर असून एकूण कामाच्या 30% काम पुर्ण झाल्याचे दिसून येत आहे.

मालवाहू वाहतूकीसाठी रेल्वेचे विशेष नियोजन – (Pune Railway Station)

सध्या मंजूर करण्यात आलेल्या निधी अंतर्गत स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येत आहे. यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 2, 3 आणि 6 ची लांबी वाढवली जाईल. तसेच प्लॅटफॉर्म 3 व 4 चे मुख्य मार्गिकेत रूपांतर केले जाणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील मार्गीकांवरून मालवाहू वाहतूक करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत दोन वेगळे रेल्वेमार्ग तयार केले जाणार आहेत. प्राथमिक टप्प्यातील मार्ग क्रमांक ६ आणि ८ चे मुंबईच्या बाजूचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. तिथे लोहमार्गांचे काम सुरू असून, ओव्हरहेड वायरचे कामही लवकरच सुरू होणार आहे. सिग्नल यंत्रणेचे काम सुरू असून, तिथे रिले रूमसाठी वेगळी व्यवस्था निर्माण केली जात आहे.

संगम पूलजवळ लोकलसाठी नवीन टर्मिनल उभारण्यात येणार

पुणे रेल्वे स्थानकातील (Pune Railway Station)या सर्व विकासकामामुळे रेल्वे स्थानकात लांबी वाढल्यानंतर २६ डब्यांच्या गाड्या या ठिकाणी उभ्या राहू शकतील. पुणे रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या गाड्यांचे डबे वाढवले जाणार आहे. यामुळे गर्दीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या संगम पूलजवळ लोकलसाठी नवीन टर्मिनल उभारण्यात येणार आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनकडून यासाठी जागा निश्चित केली गेली आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळ दरम्यान सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढणार आहे.

काम पूर्ण होण्यासाठी किती लागेल कालावधी? 

पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रमुख विस्तारीकरणाला दिवाळीचा मुहूर्त निघेल अशी आशा आहे. साधारणपणे काम पुर्ण होण्यासाठी 107 दिवसांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे.