Pune Railways | दोन दिवसावर आलेल्या दिवाळीमुळे शहरामध्ये असलेले अनेकजण गावी निघालेले आहेत. दिवाळीनिमित्त सलग सुट्ट्या असल्याने प्रवाश्याचे पाय गावाकडे निघाले आहेत. साहजिकच, एसटी बसेस असो वा रेल्वे असो, सर्वत्र मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे विभाग सुद्धा विशेष खबरदारी घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठीही रेल्वेकडून 391 गाड्या सोडल्या जाणार आहेत.
दीड लाख प्रवासी करतायेत रोज प्रवास- Pune Railways
दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यामुळे सर्वांनाच गावी जाण्याची घाई झाली आहे. त्यामुळे रोजचे हजारो प्रवासी प्रवास करता आहेत. त्यात रेल्वेने (Pune Railways) काढलेल्या अंदाजे आकडेवाडी नुसार रोज तब्बल दीड लाख प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी जास्तीच्या गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असल्याचे सांगितले जात आहे. वाढलेल्या गर्दीमुळे अनेक गुन्हे होण्याची शक्यता ही खोटी ठरवली जात नाही. यासाठी खबरदारी म्हणून पुणे रेल्वे स्थानकावर सुरक्षेचा चोख बंदोबस्त घालून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासीही निर्धास्तपणे प्रवास करू शकतील.
राज्यासह इतर ठिकाणाहूनही सोडल्या जातायेत ज्यादाच्या गाड्या-
पुण्यावरून इतर राज्यांकडे गाड्या (Pune Railways) सोडल्या जात आहेत. त्यामध्ये झारखंड, उत्तर प्रदेश, रांची यासारख्या राज्यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील कोल्हापूर, नागपूर आणि लातूरसाठीही अधिकच्या गाड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना याचा चांगलाच फायदा होत असून त्यांचा प्रवास हा सुखकर होताना दिसून येत आहे. तसेच रेल्वेस्थानकावर प्रवाश्यांना तिकीट काढण्यासाठी गर्दीचा त्रास नको म्हणून तिकीट सेंटरही वाढवले आहेत. दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडाळाने आपल्या तिकीट दरात तब्बल १० टक्के वाढ केली आहे, तर दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स वाले सुद्धा प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन एकप्रकारे लूट करत आहेत. अशावेळी अनेक प्रवाशी स्वस्तात मस्त अशा रेल्वेला प्राधान्य देत आहेत.