Pune Real Estate : पुणे मेट्रोमुळे रिअल इस्टेटला बळ; मालमत्तेच्या किमती 30-35 टक्क्यांनी वाढल्या

Pune Real Estate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Real Estate। पुणे हे शिक्षण आणि विड्याचे माहेरघर तर आहेच. परंतु नोकरदार वर्गासाठी सुद्धा अतिशय छान असं शहर आहे. पुण्यात अनेक ऑटोमोबाईल कंपन्या, आयटी कंपन्या असल्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात नोकरीसाठी लोक येतात. साहजिकच, पुण्यातील लोकसंख्या वाढली… वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ लागल्याने पुण्यात मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी हि मेट्रो ऐटीत धावतेय. मेट्रो सेवेमुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न थोडापार का होईना मिटला आहे. तर दुसरीकडे याच मेट्रो मुळे पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला चांगलीच गती आली आहे. मेट्रो स्थानकांच्या शेजारील मालमत्तेच्या किमती तब्बल ३०-३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

1 ते 2 कोटींच्या घरांची विक्री मोठ्या प्रमाणात – Pune Real Estate

पुणे मेट्रोच्या विकासामुळे रिअल इस्टेस्ट क्षेत्राला जणू सोन्याच्या खाणीचे रूप (Pune Real Estate) आलं आहे. क्रेडाई पुणेच्या मते, २०२१ पासून, हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी, ताथवडे आणि औंध सारख्या भागात प्रीमियम घरांच्या विक्रीत ३००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. खास करून १ ते २ कोटींच्या घरांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. पिंपरी चिंचवडमधील पुनावळे, रावेत, मोशी आणि पिंपळे सौदागर यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये परवडणाऱ्या आणि मध्यम श्रेणीतील घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. लोक या भागात फक्त घरे खरेदी करत नाहीत, तर नंतर भाड्याने देण्यासाठी त्यात गुंतवणूक करत आहेत. तर दुसरीकडे बरेच भाडेकरू सुद्धा आता मेट्रो स्टेशनजवळील घरांची मागणी करतात.

ज्यांनी पूर्वी घर खरेदी करण्याचा विचार केला नव्हता ते देखील आता मेट्रो कॉरिडॉरभोवती घर खरेदी करू पाहतायत. पुणे मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्याने आणि मालमत्तेची मागणी वाढल्याने पुण्यातील मालमत्तांचे दर (Pune Real Estate) प्रति चौरस फूट अंदाजे २५-३०% ने वाढले आहेत. बाणेर, औंध, बावधन आणि कल्याणी नगर सारख्या प्रीमियम भागात तर या रेट आणखी उच्चांक गाठला आहे. या परिसरातील मालमत्तेत ३५-४०% वाढ झाली आहे. दुसरीकडे, मोशी, रावेत आणि वाघोली सारख्या काहीशा कमी विकसित भागात २०-२५% ने वाढ झाली आहे. मेट्रो स्टेशनच्या जवळ असणे हेच या सर्व किमती वाढण्याचे आणि किमतींमध्ये फरक करण्याचे एक महत्त्वाचे कारण बनले आहे. मेट्रो स्थानकापासून ५०० मीटरच्या आत असलेल्या मालमत्तांच्या किमतीत वार्षिक १०-२५% वाढ होत आहे, ज्यामुळे घर खरेदीदार आणि डेव्हलपर्स दोघांनाही त्यांचे आकर्षण दिसून येते.