पुणे प्रतिनिधी । आज पुणे विभागात एकूण १ हजार २६२ रुग्णांची वाढ झाली आहे. विभागातील एकूण रुग्णसंख्या आता ३६ हजार ६७१ इतकी झाली आहे. आतापर्यंत विभागातील २२ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या १३ हजार ३४२ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. आतापर्यंत विभागातील एकूण १ हजार २८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७०२ रुग्ण गंभीर अवस्थेत असून उर्वरित रुग्ण निरीक्षणाखाली आहेत. विभागातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६०.१२% असून मृत्यूचे प्रमाण ३.४९% इतके आहे. विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर यांनी ही माहिती दिली.
पुणे जिल्ह्यात एकूण ३० हजार ४२५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील १८ हजार ३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ११ हजार १३५ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात एकूण ८९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४९४ रुग्ण अत्यवस्थ आहेत. जिल्ह्यातही रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. जिल्ह्यात हे प्रमाण ६०.४६% आहे तर मृत्यूचे प्रमाण २.९४% इतके आहे.
पुणे जिल्ह्यात आज १ हजार २२ रुग्ण वाढले आहेत. सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अनुक्रमे ३८, १६०, २५, १७ अशी रुग्णसंख्या वाढली आहे. सध्या या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे ५०४, १२४२, २३७, २२४ असे उपचार घेणारे रुग्ण असून या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३ हजार ३७१ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली नव्हती पण २-३ दिवसापासून रोज नवे रुग्ण आढळून येत आहेत.