पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आज दिवसभरात राज्यात ३६०७ रुग्णांची अर्थात आतापर्यंतच्या सार्वधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज पुण्यातही मोठ्या संख्येत रुग्णांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. आज दिवसभरात पुण्यात २६८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच सात रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे.
पुण्यातील एकूण रुग्णसंख्या आता ८ हजार ७७७ झाली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४१३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ७८२ रुग्ण बरे झाले आहेत. आज २०७ रुग्णांची पुन्हा तपासणी केली असता त्यांचे अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासादायक आहे.
जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरात आज सर्वाधिक ८९ रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच शहरातील एकूण रुग्णसंख्या १ हजार १७ झाली आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आणि हद्दी बाहेरील एकूण १०१७ जण करोना बाधित आहेत. पैकी, ५१६ हद्दीतील तर हद्दीबाहेरील ७५ जणांना करोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. दरम्यान, आत्तापर्यंत ३७ जणांचा मृत्यू करोना विषाणूमुळे झालेला आहे. प्रशासनाकडून सामाजिक अलगाव चे नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.