पुणे प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात आत्तापर्यंत ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता पुण्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला असल्याची माहिती आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ६३५ वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत एकुण ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील एकट्या पुण्यात ८२ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आहेत. आज पुण्यातील ससुन रुग्णालयात ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. पुण्यातील हा कोरोनाचा तिसरा बळी असल्याचे समजत आहे.
दरम्यान, सदर महिलेचा राहत्या घरी मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. आता महिलेला ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला
राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत
अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम
उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..