सातारा | पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग 97. 50% पूर्ण झाला आहे. या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून जे काही काम राहिले आहे. ते काम लवकरच पूर्ण करण्याचा शासनाचा मनोदय असल्याचे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सदस्यांकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे. राज्यातील विकास कामांची माहिती मागितली जात आहे. पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्गबाबत देखील हिवाळी अधिवेशनातून एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर दिली आहे.
मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, पुणे- सातारा महामार्गाच्या कामासाठी जमीन हस्तांतरित करण्यास विलंब झाला. अतिरिक्त सुविधांसाठी जनतेची वारंवार मागणी झाली असून अजूनही होत आहे. महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्यासाठी वेळ लागला, तसेच मध्यंतरी आलेल्या कोरोनामुळे देखील महामार्गाच्या कामाला ब्रेक लागला होता. अशा परिस्थितीत महामार्गाचे काम कासवगतीने झाले आहे. सद्यस्थितीला हा महामार्ग सुस्थितीत असून वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली जात आहे.
सुधारित अहवाल राष्ट्रीय प्राधिकरणाकडे
मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 एप्रिल 2022 पर्यंत या महामार्गाची बहुतांशी कामे ही पूर्ण झाली आहेत. काही उर्वरित कामे राहिली आहेत ती देखील लवकरच पूर्ण केली जाणार आहेत. बाकी राहिलेल्या कामांमध्ये किकवी (ता. भोर), शिवरे व खेड शिवापुर येथील कामांचा समावेश आहे. खरं पाहता येथील स्थानिकांनी आपल्या काही मागणीसाठी विरोध केला होता. यामध्ये पादचारी भुयारी मार्ग, पादचारी उड्डाणपूल ऐवजी तेथे वाहन भुयारी मार्गाची मागणी केली होती. अशा परिस्थितीत या मागणीनुसार नवीन सुधारित अहवाल मान्यतेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे महामार्गावरील या कामांना ब्रेक लागला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या कामास मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच राहिलेले कामे होणार आहेत.