Thursday, March 30, 2023

पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असतानाच आता पुण्याचं नामांतर ‘जिजापूर’ करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील निशाणा साधला. थोरात यांना टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार नाही आणि पचणारही नाही. आमचा वारसा आम्हाला गौरवपूर्ण चालवू द्या, असा चिमटाही त्यांनी काढला.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास वेळ लागत असेल तर पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव देऊन या शहराचं नामांतर ‘जिजापूर’ असं करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. जिजाऊंनी बेचिराख झालेलं पुणे शहर बसवलं. पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. पुणे शहर हे माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे नामांतराचं राजकारण करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करायला शिका, असं शिंदे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’