दुर्दैवी ! सख्ख्या बहीण भावाचा कॅनॉलमध्ये पडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये सख्खे बहीण-भाऊ सायकवर खेळत होते. यादरम्यान खेळता खेळता आत्याकडे जाण्यासाठी निघाले. त्या ठिकाणी जाताना त्यांना कॅनलचा रस्ता ओलांडावा लागत असे. यावेळी मोठी बहीण पुढे सायकल चालवत होती तर छोटा भाऊ सायकलच्या मागच्या सीटवर बसलेला. मात्र पुढे यांच्या आयुष्यात काय लिहिले आहे याची जरासुद्धा कल्पना त्यांना नव्हती. यादरम्यान कॅनलच्या रस्त्यावरुन जात असताना सायकल अचानक घसरली आणि हे दोघे सायकलसटक कॅनलमध्ये पडले. बराच वेळ मुले कुठे दिसली नाहीत म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

या मुलांचे कुटुंबीय आपली मुले कुठे सापडत नाही आहेत म्हणून कासावीस झाले. यानंतर गावातील तरुणांनी कालव्यात उतरून शोध घेतला गेला असता रात्रीच्या सुमारास कालव्याच्या दोन ते तीन किलोमीटर आतमध्ये दोन्हीही चिमुरडी मुलं जलपर्णीत अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. या दोघाही सख्ख्या भाऊ-बहिणींच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतमध्ये हि दुर्दैवी घटना घडली आहे. जागृती ढवळे आणि शिवराज ढवळे अशी दोन्ही मृत मुलांची नावं आहेत. हे दोघेही मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील देऊळगावचे राहणार आहेत. जागृती सहा तर शिवराज अवघ्या तीन वर्षांचा होता.

काय घडले नेमके ?
संध्याकाळी जागृती आणि शिवराज सायकलवर खेळत होते. जागृती सायकल चालवत होती. तर शिवराज सायकरच्या मागच्या सीटवर बसलेला. बेबी कालवा पार करुन ही दोघंही जण आत्याकडे जाण्यासाठी निघाले. तेव्हा कॅनलच्या रस्त्यावर त्यांची सायकल घसरली. सायकलसकट दोघंही ही कॅनलमध्ये पडले आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जागृती आणि शिवराज यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने ढवळे कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.