हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. २ दिवसांपूर्वी पुण्यात ट्र्क आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्यांनतर आता पुणे -सोलापूर महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. तेलंगणाच्या दिशेने जाताना खासगी बस पलटी झाली असून जवळपास 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी आहेत. काल रात्री 9 वाजता ही भीषण दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक खासगी प्रवासी बस मुंबई ते निजामाबाद असा प्रवास करत होती. यावेळी पुणे – सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्याच्या हद्दीत अचानक दुचाकीस्वार समोर आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात बस महामार्गावर उलटली झाली. अपघातावेळी बसमध्ये 40 च्या आसपास प्रवासी होते. यातील 12 ते 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे.जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
#WATCH | Maharashtra: 12 people were injured after a bus travelling from Mumbai to Nizamabad overturned on Pune-Solapur Highway near Yavat. The accident occurred when the driver applied brakes to avoid hitting a motorcycle. The injured passengers were taken to the hospital but… pic.twitter.com/sTlAO15LwY
— ANI (@ANI) April 24, 2023
या भीषण अपघातानंतर पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तेथील स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी जखमींना उपचारासाठी चौफूला आणि यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.