हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठवाड्यातुन मोठ्या संख्येने लोक नोकरी व शिक्षणासाठी पुणे शहरात दाखल होत असतात . त्यामुळे मराठवाड्यातून पुण्यात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाडयांना तोबा गर्दी पाहायला मिळते . त्यामुळे अनेक प्रवश्यांना नाईलाजाने अन्य पर्यायचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्यांची प्रवासात मोठी फजिती पाहायला मिळते . या सर्व गोष्टी लक्षात घेता मध्य रेल्वेने (Central Railway) मराठवाड्यासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या माध्यमातून सोडण्यात येणारी ही विशेष रेल्वे पुणे ते हरंगुळ ( लातूर ) दरम्यान धावेल . पुणे ते हरंगुळ ( लातूर ) दरम्यान असलेल्या मार्गांवर सध्या रेल्वे गाड्यांच्या प्रमाण खूपच कमी आहे. ज्या रेल्वेगाड्या या मार्गांवरून धावतात त्यांना प्रचंड प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या व येणाऱ्यांना कित्येक महिने आधीपासून आपले तिकीट बुक करून ठेवावे लागते. ह्या गोष्टीचा विचार करता मध्य रेल्वे विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा घेतलेला निर्णय प्रवाश्यांसाठी दिलासादायक आहे.
मध्यरेल्वेने सुरु केलेली विशेष रेल्वेसाठी प्रवाश्यांना 8 ऑक्टोबर पासून तिकीट बुकिंग करता येतील. सदर रेल्वे 10 ऑक्टोबर पासून या मार्गांवर सुरु करण्यात येणार आहे. सध्या ही रेल्वे 10 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंतच्या मर्यादित काळासाठी विशेष ट्रेन म्हणून सोडण्यात येईल. त्यानंतर प्रवाश्यांचा प्रतिसाद बघून पुढे ही ट्रेन कायम करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
काय असेल ट्रेनचे वेळापत्रक-
पुणे- हरंगुळ ही ट्रेन पुण्याहून सकाळी सहा वाजून १० मिनिटांनी ही गाडी सुटेल. त्याच दिवशी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी हरंगुळला पोहोचेल.हरंगुळ- पुणे ही गाडी हरंगुळ येथून दुपारी पुण्यासाठी तीन वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ती पुण्यात रात्री नऊ वाजता पोहोचेल. गाडीला हडपसर, उरुळी, केडगाव, दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन आणि धाराशिव हे थांबे जाहीर करण्यात आले आहेत. सदर गाडी पुणे ते हरंगुळ दरम्यान सुरु केल्यामुळे मराठवाड्यातील प्रवाश्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.