जेट एअरवेजने लाँच केली पुणे ते सिंगापूर खास विमान सेवा

Pune to Singapur Jet Airways Flight
Pune to Singapur Jet Airways Flight
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | खासगी वाहतूक सेवा पुरविणाऱ्या जेट एअरवेज कंपनीने १ डिसेंबारपासून पुणे ते सिंगापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेची अंमलबजावणी यापूर्वी मुंबई, दिल्ली, बंगळूरु शहरात सुरु आहे.

लवकरच देशातील अनेक शहरात ही सेवा नेण्याचा निर्णय घेणार असल्याचं एअरलाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी सांगितलं. जेट एअरवेयजच्या तिकिटाचा दर २१००० ते ६५००० पर्यंत असणार आहे. या सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ११ शहरातून हा प्रवास केला जाणार आहे.
गेल्या वर्षी (२०१७) तब्बल ३६००० प्रवाशांचा अभ्यास करून या शहरांचा हवाई वाहतूक मार्ग निवडला आहे.

ही आहेत ती शहरं ज्यातुन विमानसेवा जाणार आहे –

जकार्ता, डेनस्पार, बाली, फुकेत, क्वालालांपुर, ब्रिस्बेन, नाडी, मेलबर्न, पर्थ, सुरबाया, सिडनी, डार्विन मार्गे सिंगापूर.