नाशिकच्या प्रवाशांना मोठा फटका!! हुतात्मा एक्स्प्रेसचा रुट बदलला; आता ‘या’ मार्गे धावणार

pune to nashik bhusawal train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिककरांसाठी पुण्याला जाण्यासाठी रस्ते मार्गाने 5 ते 6 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे हा प्रवास अत्यंत कंटाळवाणा होऊन जातो. यामुळे नाशिककर पर्यायी रेल्वेमार्गाचा वापर करतात. नाशिकहुन पुण्याला जाण्यासाठी सरळ सरळ कुठलाही रेल्वेमार्ग नसला तरी नाशिकरांनी संघर्षातून पुणे – भुसावळ हुतात्मा (Hutatma Express) एक्सप्रेस सुरु केली होती.या रेल्वेमुळे नाशिककर कमी पैश्यात पुणे शहर गाठू शकत होते. तसेच रस्ते मार्गाने होणारी दगदग देखील रेल्वे प्रवासामुळे कमी होत होती. परंतु आता हीच रेल्वे अमरावतीला पळवण्यात आली आहे, त्यामुळ नाशिकरांचा हिरमोड झाला आहे.

पुणे – भुसावळ एक्सप्रेस बंद :

पुणे ते भुसावळ ही गाडी पुण्याला जाण्यासाठी ही एकमेव गाडी होती. नाशिककरांनी तीव्र संघर्ष करून ती मिळविली होती. या ट्रेनमुळे कल्याण, पनवेलपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली होती. मात्र ही गाडी आता नाशिक मार्गे बंद करून पुणे ते अमरावती मार्गांवर सुरु करण्यात येणार आहे. आता ही ही गाडी दौंड, अहमदनगर, मनमाडमार्गे अमरावतीपर्यंत नेण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने त्याला मंजुरीही दिली आहे. ही गाडी पुण्यातील उरळी येथून दौंड कोरड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा येथे ती थांबेल, असे रेल्वे बोर्डाचे संयुक्त संचालक संजय नीलम यांनी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

आत्तापर्यंत नाशिकरांच्या या हक्काच्या एक्सप्रेस वळवल्या :

– पंचवटीचा एक्सप्रेसचा ताण कमी करण्यासाठी राज्यराणी सुरु करण्यात आली. २०१८ मध्ये ती थेट नांदेडपर्यंत नेण्यात आली.
– मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसला मोठा प्रतिसाद असूनही प्रवासी नसल्याचे कारण देत रेल्वेने ती कायमची रद्द केली.
– नाशिकरांसाठी सुरु करण्यात आलेली तपोवन एक्सप्रेस नांदेड पर्यंत वळवण्यात आली.
– देवळाली – भुसावळ पॅसेंजर नाशिकरांसाठी महत्वाची पॅसेंजर बंद करण्यात आली.
– पुणे – भुसावळ एक्सप्रेस नाशिकरांसाठी बंद करून अमरावतीला वळवण्यात आली.