खळबळजनक! पुण्यात युवा सेना पदाधिकाऱ्याची सपासप वार करून निर्घृण हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुण्यात युवा सेना पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात एकच खळबळजनक उडाली आहे. दीपक मारटकर (वय ३६) असे या युवा नेत्याचे नाव आहे. दीपक हा शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा होता. ही घटना शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास गवळी अळी शुक्रवारपेठ परिसरात घडली. रात्री १ वाजता घराबाहेर फिरण्यास आलेल्या दीपकवर दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी धारदार हत्याराने दीपकवर सपासप वार केले.

गंभीर जखमी झालेल्या मारटकर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, पहाटे दोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ५ ते ६ हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने मारटकर यांच्यावर खुनी हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. रात्री जेवण करून दीपक बाहेर आले होते. दरम्यान आधीपासूनच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. डोके, पाठ आणि छातीवर सपासप वार करून हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाल्याचे समजते. सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता. मोटरसायकलवर नंबर प्लेट नव्हती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा माग काढण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.