केंद्र सरकारने बदलले नियम! ज्याने रस्ता अपघात झालेल्यास मदत केली आता त्याला Personal Details देण्याची गरज नाही

हॅलो महाराष्ट्र । रस्ते अपघातात पीडितांना मदत करणाऱ्यांना कायदेशीर अडचणीतून मुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम जारी केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोलीस आणि हॉस्पिटल यांच्याकडून अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदत करणार्‍या लोकांचे (Good Samaritan) नाव, पत्ता, ओळख, दूरध्वनी क्रमांक किंवा इतर पर्सनल डिटेल्‍स (Personal Details) देण्यास भाग पाडले जाणार नाही. जर आपल्याला सोप्या भाषेत समजून घायचे असेल तर आता आपण कोणत्याही भीतीशिवाय एखादी दुर्घटना आणि रस्ते अपघातातील पीडितांना मदत करू शकता.

मदत करणाऱ्याला वाटले तरच तो आपले डिटेल्‍स अधिकाऱ्यांसह शेअर करू शकेल
या नवीन नियमांनुसार आता लोकांना मदत करणार्‍या चांगल्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागवले जाईल. ते धर्म, जाती आणि राष्ट्रीयतेपेक्षा वरचढ ठरतील. तसेच, यात हे देखील स्पष्ट केले गेले आहे की, जर मदत करणाऱ्याला स्वत: ला वाटत असेल तरच तो अधिकाऱ्यांना आपले पर्सनल डिटेल्‍स देऊ शकेल. या व्यतिरिक्त, सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना आपले प्रवेशद्वार, त्यांची वेबसाइट आणि विशेष ठिकाणी हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील एक चार्टर ठेवावा लागेल. यात अपघातात मदत करणाऱ्या चांगल्या नागरिकांच्या अधिकारांचा (Rights of Good Samaritan) तपशील असेल.

साक्षीदार बनण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीची नवीन कायद्यानुसार चौकशी केली जाईल
केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये अपघात झाल्यास एखादी व्यक्ती साक्षीदार बनण्यास तयार असेल तर नव्या कायद्यातील तरतुदींनुसारच त्याची चौकशी केली पाहिजे. त्यासाठी मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम, 2019 मध्ये कलम 134 A जोडले गेले आहे. या अंतर्गत, मदत करणार्‍यास संरक्षण दिले जाते. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की, पीडित व्यक्तीस मदत करणार्‍याला पीडिताला (Victim) झालेल्या कोणत्याही दुखापतीसाठी किंवा मृत्यूसाठी जबाबदार धरले जाणार नाही. त्याच्याविरोधात कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी खटला (Civil/Criminal Case) दाखल होऊ शकणार नाही.

मंत्रालयाने हे स्पष्ट केले की,’Good Samaritan’ कोणाला म्हटले जाईल
यावेळी मंत्रालयाने ‘Good Samaritan’ ची व्याख्या देखील स्पष्ट केली आहे. त्यानुसार, चांगल्या हेतूने, आपत्कालीन आणि वैद्यकीय सेवा किंवा अपघातग्रस्त व्यक्तीची वैद्यकीय उपचारात, त्याच्या इच्छेनुसार आणि बक्षीस किंवा भरपाईची अपेक्षा न करता, मदत करणारी व्यक्ती म्हणजे ‘Good Samaritan’. देशातील रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे 1.5 लाख जणांचा मृत्यू होतो. ही संख्या जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा खूपच जास्त आहे. या नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे रस्ते अपघातातील पीडितांना तातडीने मदत करणे शक्य होईल आणि मृत्यूचे प्रमाणही काही प्रमाणात नियंत्रित होऊ शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like