नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये कोरोना साथीने नाकीनऊ आणले आहे. अशातच संपूर्ण देशात लसीकरण हा महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. देशात लसीकरण मोहीम तीव्र केली आहे. अनेक कंपन्यांनी लसींचे चे उत्पादन वाढविण्यासाठी भर दिला आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता कोव्हीडशिल्ड बरोबरच sputnik V सुद्धा तयार करू शकते. रशियन लसीच्या उत्पादनाच्या चाचण्यांसाठी परवाना मिळण्यासाठी सिरम संस्थेनं ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया कडे(DCGI) परवानगी मागितली आहे याबाबतची माहिती वृत्तसंस्थेला दिली आहे.
Serum Institute of India (SII) applies to the Drug Controller General of India (DCGI) seeking permission for a test license to manufacture COVID19 vaccine, Sputnik V: Sources pic.twitter.com/U10LWA5Imr
— ANI (@ANI) June 3, 2021
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रोजेनका यांच्या सहकार्याने कॅव्हिडशील्ड बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ने आता स्पुटनिक व्हीच्या चाचणी विश्लेषण आणि परीक्षणासाठी अर्ज केला आहे. स्पुटनिक-व्ही देशात सध्या आपात्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडून मान्यता देण्यात आली आहे. सध्या भारतामध्ये रेड्डीज लॅबोरेटरी मध्ये स्पुटनिक ची निर्मिती केली जात आहे.
आपात्कालीन वापरासाठी रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीची 12 एप्रिल रोजी नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर 14 मे पासून या लसीचा वापर सुरू करण्यात आला आहे. आरडीआयएफ आणि पॅनासिआ बायोटेक यांनी स्पुटनिक व्ही लसीचे लसीचे वर्षाला दहा कोटी डोस बनविण्याविषयी सहमती दर्शवली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही लस वयस्कर व्यक्तींमध्ये सुमारे 83 टक्के प्रभावी असल्याची माहिती आहे.स्फुटनिकची नवीन स्पुटनिक लाईट ही लस वृद्ध लोकांमध्ये 83 टक्के प्रभावी आहे. यासोबतच महत्त्वाचं म्हणजे याचा एकच डोस पुरेसा असतो.