औरंगाबाद: पुण्याच्या हडपसरमधील वक्फ बोर्डाची जमीन हडपण्यासाठी ट्रस्टच्या प्रस्तावाची बनावट कागदपत्रे व स्वाक्षरी करुन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द औरंगाबादेतील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फारुख जलाऊद्दीन सय्यद, महेबुब अब्दुल गफ्फार शेख, फारुख दिलावर मनीयार आणि अन्वर शमशोद्दीन सय्यद (सर्व रा. हडपसर, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.
अब्दुल कदीर साहेब पीर दर्गा हडपसर येथील ट्रस्ट बनविण्यासाठी प्रस्तावावर मोहम्मद अमीन सय्यद (वय ६५, रा. सय्यदनगर, मोहम्मदवाडी रोड, हडपसर, ता. हवेली, जि. पुणे) यांची बनावट स्वाक्षरी, फोटो व नावाचा वापर केला. तसेच बनावट कागदपत्रे तयार करुन महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद येथे १४ फेब्रुवारी २०२० रोजी चौघांनी प्रस्ताव दाखल केला.
या प्रस्तावाआधारे चौघांनी वक्फ बोर्डाची फसवणूक केली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सचिन वायाळ करत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group