खळबळजनक! विहिरीत आढळला मृतावस्थेत बिबट्या

औरंगाबाद – शहरातील चिकलठाणा परिसरातील एका विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चौधरी कॉलनी परिसरातील महादेव मंदिराजवळील विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. चौधरी कॉलनी परिसरातील महादेव मंदिराजवळ एक विहिर आहे. या परिसराच्या बाजूला शेती असून विरळ वस्ती आहे. हा परिसरात भाविकांचे येणेजाणे असते. आज दुपारी काही … Read more

ना OTP सांगितला, ना पासवर्ड… तरीही पोलिस अधिकार्‍यांच्याच क्रेडिट कार्डमधून पैसे लंपास

Credit Card

औरंगाबाद : ना ओटीपी सांगितली , ना पासवर्ड तरीही सायबर भामट्यानि सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या क्रेडिट कार्ड मधून रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक बालाजी जळबाजी सोनटक्के यांनी दिलेली फिर्याद अशी की, 14 मे … Read more

पोलीस पुत्रावरच विनयभंगाचा गुन्हा

crime

औरंगाबाद – शहरातील एमजीएम विद्यापीठातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची छेड काढल्या मुळे पोलिस पुत्राच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस पुत्राने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित विद्यार्थिनीच्या तीन मित्रांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा शनिवारी मध्यरात्री नोंदवण्यात आला. सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमजीएम विद्यापीठातील एक विद्यार्थी नितीन मित्रांसोबत चहा पिण्यासाठी एमजीएम … Read more

घरफोड्या करून चोरट्यांनी केले नववर्षाचे स्वागत; वाळूज परिसरात सात घरफोड्या

Gharfodi

औरंगाबाद – वाळूज परिसरात वडगाव (को) येथील गट क्रमांक पाच व गट क्रमांक आठमधील एकूण बंद असलेल्या सात घरांचे कडी, कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोने, चांदी असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. सर्वजण नववर्षाच्या स्वागताला लागलेले असल्याने चोरट्यांनी हा डाव साधला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस गस्त घालण्याची मागणी करण्यात … Read more

अज्ञात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

औरंगाबाद – जालना महामार्गावरून गोलटगावकडे जाणाऱ्या जोड रस्त्यावर हसनाबादवाडी शिवारात आज सकाळी एका तिशीतील युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या युवकाच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमेचे व्रण असल्याने हा घात की अपघात अशी स्थिती असून करमाड पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. आज सकाळी करमाड पोलिसांना खबर मिळाली की, एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गोलटगावला जाणाऱ्या … Read more

पंधरा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार ! आईच्या सतर्कतेमुळे फुटली वाचा

rape

औरंगाबाद – शिवण क्लाससाठी जाणाऱ्या एका 15 वर्षीय विद्यार्थिनीला पंचवीसवर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे त्यावेळी मोबाइलमध्ये काढण्यात आलेली चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत हा प्रकार दोन महिन्यांपासून सुरू होता. आईने मुलीची बॅग तपासल्याने ही घटना समोर आली असून आरोपीला अटक करण्यात आली. पंधरावर्षीय विद्यार्थिनी आई व सावत्र वडिलांसह बजाजनगर येथे … Read more

20 लाख रुपयांसाठी डॉक्टर पतीकडून विवाहितेचा छळ; हाॅस्पिटल बांधून देण्यासाठी माहेरच्यांवर दबाव

doctor

औरंगाबाद : जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात एका डॉक्टर पतीने आपल्या पत्नीचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं ‘रुग्णालय बांधण्यासाठी माहेरून 20 लाख रुपये घेऊन ये, अन्यथा घटस्फोट दे’ असं म्हणत विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. पैशांसाठी आरोपी पतीसह सासू, सासरे आणि दीर यांनी देखील मारहाण केल्याचा आरोप पीडितेनं फिर्यादीत केला आहे. … Read more

दारुड्या मुलाने बापावरच केले कुऱ्हाडीने वार

Crime

औरंगाबाद – घरात सुनेला मारहाण करणाऱ्या दारूड्या मुलाला समजावण्यासाठी गेलेल्या बापा वरच मुलाने कुर्‍हाडीने वार केल्याची घटना काल वैजापूर तालुक्यात घडली.‌ कडू बागुल (रा. खंडाळा) असे मारहाण करणाऱ्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कडू बागुल याने बुधवारी सकाळी दारू पिऊन पत्नी सविता आईला मारहाण केली. याचवेळी शेजारी राहत असलेले त्याचे वडील रामदास … Read more

दारुड्यांची पोलिसांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण; पहा व्हिडिओ

औरंगाबाद | औरंगाबाद शहरात पोलिसांना मारहाण झाल्याची घटना घडलीय. नाकाबंदी वर असणार्‍या पोलिसांना मद्यधुंद तरुणाने मारहाण केल्याचं समजत आहे. विनामास्क प्रवास करणार्या दुचाकिस्वाराला थांबवल्यानंतर दुचाकी वरील तिन तरुणांनी पोलिसांशी अरेरावी करत त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री वसंतराव नाईक चौकातील घडला. गणेश आबाराव लोखंडे असे मारहाण झालेल्या पोलिसांचे नाव आहे. तर प्रताप पोपटराव जगताप, … Read more

औरंगाबादेत संचारबंदीत हत्येचे सत्र सुरूच… रस्त्यावर उभ्या तरुणाला भोसकले…

  औरंगाबाद:  रस्त्यावर गप्पा मारत उभ्या असलेल्या एका 21 वर्षीय तरुणाला किरकोळ कारणावरून त्याच्याच मित्रानि धारदार चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.हर्सूल पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास मारेकरी मित्राला अटक केली. गेल्या महिनाभरात संचारबंदीत रात्रीच्या वेळेस हत्येची ही तिसरी घटना असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. यश … Read more