व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अल्पवयीन मुलीची छेडछाड काढणाऱ्या तरुणास सक्तमजुरीची शिक्षा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून दमदाटी करत बदनामी करण्याची धमकी देणाऱ्या तरुणास आज एक वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सागर दिलीप सदामते असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना हि ऑक्टोबर 2014 साली घडली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सदरची शिक्षा सुनावली.

ऑक्टोबर 2014 पासून आरोपी हा पिडीतेच्या घरासमोरून फिरून, पिडीत शाळेत व क्लासला जात असताना पाठलाग करणे, मोटारसायकल आडवी मारणे, मैत्री करण्यास दमदाटी करणे, बदनामी करण्याची धमकी देणे असे कृत्य करीत होता. तसेच पिडीतेकडे कोणी बघायचे नाही मी तिला घेवून फिरतोय असे कॉलेजमध्ये सांगत होता.

पिडीतेचे आई-वडिल व मध्यस्थांनी सांगूनही आरोपीमध्ये व त्याच्या वागणूकीमध्ये कोणताही फरक पडलेला नव्हता. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पिडीत मुलीने पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पलूस पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर केसची सुनावणी विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डि. एस. हातरोटे यांच्या न्यायालयात सुरु होती. सरकार पक्षातर्फे एकुण आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुराव्याचे आधारे आरोपी सागर दिलीप सदामते यास एक वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.