हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Punjab and Sind Bank : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. आता सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब आणि सिंध बँकेने आपल्या 2 कोटींपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे.
21 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू
Punjab and Sind Bank च्या अधिकृत वेबसाइटनुसार, 21 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. बुबँक आता 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 2.80% ते 6.सरकारी 25% पर्यंत व्याज देत आहे. 601 दिवसांच्या FD वरील कमाल व्याजदर सर्वसामान्यांसाठी 7.25%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75% आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.10% आहे.
पंजाब आणि सिंध बँक FD दर
यानंतर आता Punjab and Sind Bank 7 – 30 दिवसांच्या FD वर 2.80%, 31 – 45 दिवसांच्या FD वर 3.00%, 46-90 दिवसांच्या FD वर 4.75% तर 91 ते 179 दिवसांच्या FD वर 5.10% व्याजदर देईल. तसेच आता बँकेकडून 180 दिवस ते 364 दिवसांच्या FD वर 6.10%, 1 वर्ष – 2 वर्षाच्या FD वर 6.40%, 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या FD वर 6.75%, 3 ते 10 वर्षांच्या FD वर 6.25% व्याजदर दिला जाईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वर 0.50% अतिरिक्त व्याजाचा लाभ दिला जाईल.
स्पेशल एफडी प्लॅन
हे जाणून घ्या कि, Punjab and Sind Bank कडून 300 दिवस, 601 दिवस आणि 1051 दिवसांच्या वेगवेगळ्या कालावधीच्या स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स प्लॅन देखील ऑफर करते. यामधील 300 दिवसांच्या FD वर बँकेच्या सर्वसामान्य नागरिकांना 5.25%, ज्येष्ठ नागरिकांना 5.75% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 6.10% व्याज दर मिळेल. यासोबतच पीएसबी फॅब्युलस प्लस 601 डेज फिक्स्ड डिपॉझिट्स प्लॅनमध्ये या बँकेच्या सर्व सामान्य नागरिकांना 7.00%, ज्येष्ठ नागरिकांना 7.50% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 7.85% व्याजदर मिळेल.
रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ
8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://punjabandsindbank.co.in/content/interestdom
हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा