Electric Scooter : 1 लाखपेक्षा कमी किंमतीत लाँच झाली ‘ही’ स्कुटर; 150KM रेंज…

Pure ePluto 7G Pro EV
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे भारतीय ऑटो मार्केट मध्ये गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक वाहनाकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. बाजारात एकामागून एक इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत आणि त्यांचा खप सुद्धा वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर हैदराबाद येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी Pure EV ने Pure ePluto 7G Pro EV नावाची इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. या स्कुटरच्या बुकिंगला सुरुवात झाली असून याच महिन्यात डिलिव्हरी सुद्धा सुरु होणार आहे. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरची खास वैशिष्ट्ये आणि तिच्या किमतीबद्दल जाणून घेऊया.

१०० ते १५० किलोमीटर पर्यंत रेंज-

Pure EV EPuto 7G Pro ही इलेक्ट्रिक स्कुटर EcoDryFit प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. यामध्ये ३ रायडींग मोड मिळत आहेत. या इलेक्ट्रिक स्कुटरला AIS 156 प्रमाणित 3kWh बॅटरी देण्यात आली आहे, हि बॅटरी 1.5kW इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर Pure EV EPuto 7G Pro तब्बल १०० ते १५० किलोमीटर पर्यंत रेंज देतेय.

फीचर्स –

गाडीच्या फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, ही इलेक्ट्रिक स्कुटर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. यामध्ये तुम्हाला गोल एलईडी डीआरएल, एलईडी हेडलॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, चार मायक्रो कंट्रोलर, स्मार्ट बीएमएस यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. ही स्कूटर मॅट ब्लॅक, ग्रे आणि व्हाईट अशा तीन रंगांमध्ये खरेदी करता येत आहे.

किंमत किती –

कंपनीने E Pluto 7G Pro ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात 94,999 रुपये (एक्स शोरूम किंमत) मध्ये लाँच केली आहे. कंपनीने गाडीच्या बुकिंगला सुद्धा सुरुवात केली असून लवकरच ती ग्राहकांना डिलिव्हर केली जाईल. भारतीय बाजारात ही इलेक्ट्रिक स्कुटर ओला एस1 एयरला थेट टक्कर देईल.