सुहास दाशरथेंना धक्का ! चार पदाधिकाऱ्यांची मनसेतून हकालपट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा औरंगाबाद जिल्हा होऊन आठ दिवसात उलटत नाही तोच मनसेतील गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. समाज माध्यमातून माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांचे समर्थक पक्ष विरोधी पोस्ट करत असल्याचे कारण देत, चार मनसे पदाधिकारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र काढण्यात आले आहे.

मागील आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हा कार्यकारिणीत मोठा फेरबदल केला होता. यात सुहास दाशरथे यांना जिल्हा अध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्याऐवजी राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर, वैभव मिटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे दशरथे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यातूनच मुंबईच्या काही नेत्यांविरुद्ध समाज माध्यमांवर रोष व्यक्त होत आहे.

नेमके हेच कारण देत राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, दीलीप बनकर, वैभव मिटकर, महानगर अध्यक्ष बिपीन नाईक, शहराध्यक्ष गजानन गौडापाटील, आशिष सुराडकर आदींनी स्वाक्षरीसह पक्ष विरोधी पोस्ट करणाऱ्या संदीप कुलकर्णी, रमेश पुरी, चेतन शर्मा, दीपक पवार आदींची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असून यापुढे त्यांचा पक्षाची काहीही संबंध नसल्याचे पत्र काढले आहे.

Leave a Comment