भारताला मोठा धक्का! दुखापतीमुळे पी.व्ही.सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने (P. V.Sindhu) गोल्ड मेडलची कमाई केली होती. सिंधूने (P. V.Sindhu) पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला सिंगल्समध्ये गोल्ड मेडल मिळवले. मात्र हे गोल्ड मेडल मिळवण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आता त्याच अडचणींची किंमत तिला चुकवावी लागणार आहे. गोल्ड मेडल जिंकण्यासाठी सिंधूने दुखापत असतानाही फायनल मॅच खेळली आणि मेडल जिंकले. आता तीच दुखापत गंभीर झाली आहे. यामुळे आता या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या स्पर्धेला तिला (P. V.Sindhu) मुकावे लागणार आहे. या दुखापतीचा त्रास होत असल्याने वर्ल्ड चॅम्पियनशीप खेळू शकणार नसल्याचे पत्रक तिने प्रसिद्ध केले आहे. डॉक्टरांनी काही आठवडे तिला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

दुखापत असतानाही देशासाठी खेळली
या महिन्यात जपानच्या टोकियो शहरात 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत BWF वर्ल्ड चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला माजी महिला सिंगल्स चॅम्पियन पी व्ही सिंधूला (P. V.Sindhu) मुकावे लागणार आहे. महिला सिंगल्सच्या सेमीफायनलचया मॅचमध्ये सिंधूला दुखापत झाली होती. दुखापत झालेली असतानाही मोठा संघर्ष तिने ही मॅच जिंकली होती. इतकेच नाही तर 8 ऑगस्टला झालेल्या फायनलमध्येही दुखापत असतानाही खेळत तिने (P. V.Sindhu) देशासाठी गोल्ड मेडल जिंकले होते. दुखापतीचा त्रास सहन करत तिने ही मॅच खेळली होती. आता मात्र याच दुखापतीमुळे तिला वर्ल्ड चॅम्पियनशीपला मुकावे लागणार आहे.

पी व्ही सिंधू अनेक भारतीय खेळाडूंचे प्रेरणास्थान
दोन ऑलिपिंक पदके जिंकणारी आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये बॅडमिंटनमध्ये गोल्ड मेडल मिळवणारी पी व्ही सिंधू (P. V.Sindhu) ही पहिली भारतीय महिला प्लेयर ठरलेली आहे. पी व्ही सिंधू (P. V.Sindhu) हिचे आई वडीलही आंध्र प्रदेशातून राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत. ते वॉलिबॉल प्लेअर्स होते. त्यामुळे तिला लहानपणापासूनच खेळाचे बाळकडू मिळाले होते.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात

Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण

सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर

भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…