संतापजनक ! पती पत्नीच्या भांडणात मुलाने घेतला वृद्ध आईचा जीव

Firing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मुलाने स्वतःच्या आईची गोळ्या घालून हत्या केली आहे. आईची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी संदीपचे गेल्या ५ वर्षांपासून त्याच्या पत्नीशी भांडण सुरू होते. संदीपची पत्नी सासू आणि सासऱ्यांसोबत राहत होती. 1 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता मुंडका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना रोशनी नावाच्या वृद्ध महिलेवर गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली.

तिला बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या महिलेला तिच्या ३५ वर्षीय मुलगा संदीपने गोळ्या घातल्या आहेत. या घटनेनंतर संदीप फरार झाला आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी सांगितले कि, संदीपचा पत्नी रितूसोबत वाद सुरू होता. तर पत्नी संदीपच्या आई आणि वडिलांसोबत आपल्या 5 वर्षांच्या मुलीसह रोहिणी या ठिकाणी राहत होती.

घटनेच्या दिवशी पती रात्री ९ वाजता अचानक घरी पोहोचला. यानंतर संदीपने भांडणाला सुरुवात केली. हे भांडण एवढे वाढले कि संदीपने त्याच्या आईला गोळ्या घातल्या आणि त्या ठिकाणाहून फरार झाला. पोलिसांकडून आरोपी संदीपचा शोध घेण्यात येत आहे.