हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना (IND Vs ENG) आजपासून धर्मशाळा येथे सुरु झाला आहे. भारताचा स्टार फिरकीपटू आर. अश्विन( Ravichandran Ashwin) याच्या कारकिर्दीतील हा १०० वा कसोटी सामना आहे. भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा अश्विन हा १४ वा खेळाडू ठरला आहे. यानिमित्ताने मागे वळून आत्तापर्यंतच्या अश्विनच्या कारकिर्दीत त्याने केलेले विक्रम पाहिले तर अश्विनच्या नावावर असा एक रेकॉर्ड आहे कि भलभल्यांसाठी तो रेकॉर्ड तोडणं मुश्किल ही नहीं नामुमकिन आहे… चला तर याबाबत सविस्तरच जाणून घेऊया…
मागील कसोटी सामन्यात अश्विनने कसोटी क्रिकेट मध्ये 500 बळी घेण्याचा विश्वविक्रम केला आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? आर अश्विनच्या नावावर कसोटी क्रिकेट मध्ये ५ शतके सुद्धा आहे. तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल, पण रविचंद्रन अश्विनने अनेक वेळा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन भारतासाठी अनेक उपयुक्त धावा केल्या आहेत. अश्विनने वेस्ट इंडिज विरुद्ध आत्तापर्यंत ४ शतके ठोकली आहेत, तर इंग्लड विरुद्ध सुद्धा शतकी खेळी करत आपल्या बॅटमध्येही दम असल्याचे अश्विनने दाखवून दिले आहे. २०१३ यामध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या 124 धावा हि त्याची कसोटी मधील सर्वोत्तम खेळी आहे. 500 बळी अन 5 शतके असा हा अश्विनचा हा रेकॉर्ड तोडणं जवळपास अशक्य आहे.
कशी आहे अश्विनची कारकीर्द –
रविचंद्रन अश्विनने टीम इंडियासाठी आतापर्यंत ९९ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 507 विकेट घेतल्या आहेत आणि बॅटिंग मध्येही दमदार प्रदर्शन दाखवत 3309 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 14 अर्धशतके आणि 5 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर त्याने भारताकडून 116 एकदिवसीय सामने खेळताना 156 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय अश्विनने टी-20मध्ये 65 मॅचमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत 72 विकेट घेतल्या आहेत.