केवळ धर्माच्या आधारावर सोसायटीमध्ये फ्लॅट नाकारणं हा देखील वर्णभेद- इरफान पठाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर बरेच जण आपापले अनुभव शेअर करत आहेत. क्रिकेट विश्वातही वर्णभेदी टिप्पणी झाल्याबाबत काही क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने याबाबत भाष्य केलं आहे. धर्माच्या आधारावर वर्णभेद हा मुद्दा त्याने मांडला आहे.

इरफान पठाणने मंगळवारी (9 जून) एक ट्वीट केलं होतं, ज्यात त्याने धर्माच्या आधारावर वर्णभेदाचा मुद्दा उपस्थित केला होता. ” वर्णभेद केवळ त्वचेच्या रंगापुरता मर्यादित नसून,एखाद्या सोसायटीमध्ये धर्म पाहून घर खरेदी करु न देणं हा देखील वर्णभेदाचाच भाग आहे.” असं मत 35 वर्षीय इरफानने आपल्या ट्वीटमधून व्यक्त केलं आहे. इरफानचे हे ट्वीट आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक आणि रिट्वीट केलं आहे. मात्र काही ट्विपल्सने इरफानच्या या ट्वीटचा विरोधही केला आहे.

इरफानच्या आधी वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी तसंच धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलनेही वर्णभेदावर भाष्य केलं आहे. “आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघात असताना माझ्याविरोधात वर्णभेदी टिप्पणी करण्यात आली होती,” असा आरोप डॅरेन सॅमीने केला होता. संघातील सहकारी आपल्याला कालू नावाने हाक मारायचे. पण मला कालू शब्दाचा अर्थ समजल्यावर फारच धक्का बसला. डॅरेन सॅमीने याबाबत व्हिडीओ शेअर करुन सनरायझर्स हैदराबाद संघातील खेळाडूंनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment