Rafale Jet Body Part : राफेलची बॉडी भारतातच बनणार; टाटा ग्रुपने केला करार

Rafale Jet Body Part
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rafale Jet Body Part । भारताच्या संरक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आता राफेल फायटर जेटची बॉडी हि भारतातच तयार होणार आहे. यासाठी राफेल लढाऊ विमाने बनवणारी कंपनी डसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा ग्रुप यांच्यात एक मोठा करार झाला आहे. या अंतर्गत डसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा ग्रुप ने४ उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे मोदी सरकारच्या मेक इन इंडियाला आणखी बळकटी मिळणार आहे. तसेच हा करार म्हणजे देशाच्या एरोस्पेस उत्पादन क्षमता मजबूत करण्यासाठी आणि जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असेल.

कोणकोणत्या पार्टचा समावेश- Rafale Jet Body Part

डसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा ग्रुप यांच्यातील करारामुळे पहिल्यांदाच फ्रान्सच्या बाहेर राफेल फायटर जेटचे पार्टस बाहेर तयार होतील. राफेल फायटर जेटचे जे पार्ट भारतात बनणार आहेत त्यामध्ये विमानाचा फ्यूजलेज, संपूर्ण मागील भाग, मध्यवर्ती फ्यूजलेज आणि पुढचा भागचा समावेश असेल. राफेल लढाऊ विमानातील फ्यूजलेज म्हणजेच विमानाची मुख्य डिझाईन असते. पायलट कॉकपिट, इंजिन, इलेक्ट्रॉनिक सिस्टिम आणि शस्त्र ठेवण्याची जागा यांना हा भाग जोडला जातो. तसेच विमानाचा पंखांना सपोर्ट मिळतो. Rafale Jet Body Part

या करारानंतर डसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष आणि सीईओ म्हणाले की, पहिल्यांदाच, राफेलचे फ्यूजलेज फ्रान्सच्या बाहेर तयार केले जाईल. भारतात आमची पुरवठा साखळी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल आहे. भारतीय एरोस्पेस उद्योगातील प्रमुख कंपनी असलेल्या टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेडसह आमच्या स्थानिक भागीदारांना या विस्ताराबद्दल धन्यवाद, ही भागीदारी केवळ भारताची पुरवठा साखळी मजबूत करणार नाही तर गुणवत्ता आणि स्पर्धेच्या मानकांची पूर्तता देखील करेल.

तर दुसरीकडे, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) चे सीईओ सुकरण सिंह यांनी म्हंटल कि, हे सहकार्य भारताच्या एरोस्पेस क्षेत्रासाठी एक मोठे पाऊल आहे. राफेलसारख्या प्रगत लढाऊ विमानाची संपूर्ण रचना भारतात तयार करणे हे टाटाच्या तांत्रिक क्षमतेचे आणि जागतिक स्तरावर टाटांच्या विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. हा करार भारताच्या स्वावलंबनात सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान देईल. या करारावर स्वाक्षरी केल्याने भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि संरक्षण क्षेत्रातील उपक्रमात आत्मनिर्भरतेसाठी दसॉल्ट एव्हिएशनची दृढ वचनबद्धता प्रतिबिंबित होते. जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळीत एक प्रमुख देश म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत होईल असा विश्वास सुकरण सिंह यांनी व्यक्त केला.