नवी दिल्ली । टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड मैदानावर नेहमी शांत रहायचा. तो क्वचितच रागावलेला दिसला असेल. मात्र 2006 मध्ये मलेशिया दौर्यावर एक विचित्र घटना घडली. त्याने सुरेश रैनाच्या टीशर्टवर एका विशिष्ट शब्द लिहिल्यामुळे त्याला प्रश्न विचारले. यानंतर रैनाने तो टी-शर्ट चक्क डस्टबिनमध्येच टाकला. सध्या राहुल द्रविड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण त्याला श्रीलंका दौर्यासाठी टीम इंडियाचा प्रशिक्षक बनविण्यात आले आहे.
सुरेश रैनाने आपल्या ‘Believe: What Life and Cricket Taught Me’ या पुस्तकात या घटनेविषयी सांगितले आहे. रैनाच्या टी-शर्टवर ‘Fuck’ असे लिहिलेले होते. त्याने पुस्तकात लिहिले आहे की, राहुल द्रविड म्हणाला की,” तू काय घालून फिरत आहेस हे तुला माहित आहे का ? आपण भारतीय क्रिकेटपटू आहोत. तुझ्या टी-शर्टवर जे लिहिले आहे ते तू सार्वजनिक करू शकत नाही.” सुरेश रैना पुढे म्हणाला की,” त्यावेळी मला इतका भीती वाटली की, मी ताबडतोब टॉयलटमध्ये गेलो, कपडे बदलले आणि टी-शर्ट डस्टबिनमध्ये फेकून दिला. रैनाने राहुल द्रविडच्या कर्णधार पदाच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी मलेशियामध्ये तिरंगी मालिका होत होती. यात भारताशिवाय विंडीज आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांचा सहभाग होता.
देशासाठी खेळणे हा सन्मान मानायचे
सुरेश रैना म्हणालाकी,”माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड स्वत: ला सार्वजनिक ठिकाणी कसे ठेवायचे याबद्दल खूप जागरूक असायचे.” तो म्हणाले की,” राहुल द्रविड भारताकडून खेळणे याला हा सन्मान मानायचा. त्याचा असा विश्वास होता की क्रिकेटर्स हे त्यांच्या देशाचे प्रतिनिधी आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी काय घातले आहे आणि ते स्वत:ला कसे सादर करतात याची काळजी घ्यावी.
खेळताना गंभीर असायचा
सुरेश रैनाने सांगितले की,” राहुल द्रविड हा संघाचा एक मजबूत कर्णधार होता आणि तो खेळादरम्यान गंभीर असायचा.” रैना पुढे म्हणाला की,” कधीकधी मला असे वाटायचे होते की, मी त्याला आराम करायला आणि हसायला सांगावे. पण मला हे माहित होतं की खेळाची तयारी करण्याचा हा त्याचा मार्ग होता. अशा परिस्थितीत येथे कोणीही त्यांना त्रास देऊ शकत नाही.” आज तरुणांना तयार करण्याचे श्रेय राहुल द्रविड यांना जाते. बहुतेक तरुण खेळाडू द्रविडला त्यांच्या चांगल्या खेळासाठी महत्त्वपूर्ण मानतात. आगामी श्रीलंका दौर्यावर तो संघाचा प्रशिक्षक आहे. संघात अनेक तरुण खेळाडू आहेत. भारतीय संघाला तेथे तीन एकदिवसीय मालिका आणि तीन टी -20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा