Rahul Gandhi Car Attack : राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक; काचा फोडल्या (Video)

Rahul Gandhi Car Attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rahul Gandhi Car Attack : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगाल येथे आली असून यावेळी एक मोठी घटना घडली आहे. राहुल गांधी यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. राहुल गांधींच्या कार वर दगडफेक करण्यात आली असून यामध्ये त्यांच्या कारची मागची काच पूर्णपणे फुटली आहे. या संपूर्ण घटनेने पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या दगडफेकीनंतर कोणाला दुखापत झाली आहे का? याबाबत माहिती अजून समोर आली नाही.

कोणी केला हल्ला – Rahul Gandhi Car Attack

पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधींच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मालदा जिल्ह्यातील लाभा पुलाजवळ हजारोंचा जमाव जमला होता त्याचवेळी राहुल गांधींच्या काळ्या रंगाच्या SUV कारवर दगडफेक (Rahul Gandhi Car Attack) करण्यात आली. या हल्ल्यात गाडीच्या मागील विंडशील्डचा चक्काचूर झाला आहे. काही अराजकवादी घटकांनी हा हल्ला केला आणि या अराजकतावादी घटकांचा सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

दरम्यान, 14 जानेवारी 2024 रोजी मणिपूर येथून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली “भारत जोडो न्याय यात्रा” सुरू झाली. यावेळी एकूण ६७ दिवसांच्या पदयात्रेत ६,७१३ किलोमीटर अंतर पार करतील. भारत जोडो न्याय यात्रा एकूण १५ राज्यांतील ११० जिल्ह्यांतून प्रवास करेल आणि २० मार्चला मुंबईत धडकेल. सध्या ही यात्रा बिहारमधील कटिहार येथून बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास मालदा मार्गे पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगात बळ आणण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतील.